महिलामध्ये सेंचूरिअन तर पुरुषामध्ये टर्फ मास्टर ठरले विजयी.

मुंबई (शांताराम गुडेकर )
सालाबाद प्रमाणे यंदाही एस.पी ग्रुप तर्फे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच राजीव गांधी मैदान,मुलुंड येथे करण्यात आले होते.महिला खेळाडू,युवा क्रिकेट पट्टूना एकत्र आणत जेष्ठ खेळाडूंचा अनुभव सोबत घेत ९० खेळाडूंचा संच ९ संघामध्ये विभागून साखळी पद्धतीने स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात खेळविण्यात आली.
प्रत्येक सामना रोमहर्षक होत गेले. पुरुष खेळाडूमध्ये राजा,बेनी, कुणाल शिंदे यांची अष्टपैलू कामगिरी,रविंद्र सावंत,अप्पी,राहुल,अनिकेत यांची फलंदाजी ,आयुष,समीर गावडे,बादशहा शेख यांची भेदक गोलंदाजी तर महिलामध्ये विनायश्री गावकर,गुरुप्रीत कौर,विशाखा आचार्य यांची अप्रतिम खेळी मनात घर करून गेली.
लीग सामने संपल्यानंतर देखील टॉप २ चा थरार शेवट पर्यंत रंगला.महिलामध्ये पारसिक चॅम्पियन संघावार साखळी सामन्यात स्मशर्स संघाने विजय मिळवत जॉय -११ संघाला पुढील फेरीत प्रवेश मिळवून दिला.अंतिम सामन्यात मीनल चोप्रा यांच्या सेन्चुरिअन संघाने डॉ.कृती बाठीया यांच्या जॉय -११ संघावर एकतर्फी लढतीत विजय मिळवत मानाचा चषक पटकवला.
पुरुषामध्ये अंतिम सामन्यात मनन महाडिक यांच्या टर्फ मास्टर संघाने दिलेले ३० धावांचे आव्हान मंदार नाईक यांच्या वीरा जिजाचे मावळे संघाला गाठता आले नाही.त्यामुळे टर्फ मास्टर संघाने विजयी चषक आपल्या नावावर केला.शेवटचा चेंडू पडेपर्यंत वैयक्तिक पारितोषिक कोणाला मिळतील याची चुरस कायम होती.यामध्ये मालिकविराचा पुरस्कार अनुक्रमे प्रेरणा घाग / मनन महाडिक,सर्वोत्तम फलंदाज श्रुतिका कदम /तनय महाले,सर्वोत्तम गोलंदाज सनील कोळी / शिल्पा गायकवाड ,सर्वोत्तमक्षेत्ररक्षक अक्षदा परवते /रवी पवार तर सर्वोत्तम लक्षणीय खेळाडू बेनी / रोशनी सिंग ठरले.
सदर स्पर्धा यशस्वी ठरण्यासाठी अध्यक्ष श्री.समीर मांजरेकर,संदेश पाटील,मेघश्याम होडावडेकर,माया धुरी ,माधुरी मोरे,राज गोल्लर,राजेश महाडिक ,आशुतोष चाळके यांनी सहकार्य केले.