
*मुंबई-* बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही 90 च्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री होती. तिने ‘ब्रोकन न्यूज’ या वेब सिरीजद्वारे उत्तम पुनरागमन केले. कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकणारी सोनाली चर्चेत होती. अलीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला. या व्हिडिओत सोनाली आणि राज यांच्या जुन्या नात्याबाबत दावा करण्यात आला. राज ठाकरे यांचा 20 वर्षांपूर्वी सोनालीवर क्रश होता, अशा चर्चा रंगल्या होत्या. आता सोनालीने यावर प्रतिक्रिया देत राज ठाकरे व तिच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने एएनआयला नुकतीच मुलाखती दिली. या मुलाखतीत तिला राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, काय खरेच, मला तर शंका आहे. व्हिडिओबाबत बोलायचे झाले तर मी तिथेच उभ्या असणाऱ्या माझ्या बहिणीसोबत बोलत होते. मला माहिती नाही. जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही. कारण त्यात कुटुंब सहभागी असते, अनेक लोक सहभागी असतात.
सोनालीचे राज ठाकरेंच्या सासूशी नाते…
https://www.instagram.com/reel/DGnjsk5Mq0v/?igsh=MXIwbzUxcm95MHBjbg==
सोनाली बेंद्रेने यावेळी तिच्या व राज ठाकरेंच्या कुटुंबाच्या संबंधांविषयी सांगितले. माझे भाऊजी एक क्रिकेटपटू आहेत आणि ते राज यांच्या चुलत बहिणीच्या पतीबरोबर क्रिकेट खेळायचे. ते नेहमीच एकत्र खेळायचे. दुसरे म्हणजे, माझ्या बहिणीची सासू जी रुईया कॉलेजमध्ये विभाग प्रमुख होत्या, त्या आम्हाला इंग्लिश लिट्रेचर शिकवत होत्या, तिथून मीही आहे. आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो. राज यांच्या पत्नी शर्मिला, त्यांची सासू आणि माझी मावशी सर्व चांगल्या मैत्रिणी होत्या. शर्मिला यांच्या आईने 10 दिवस मला त्यांच्याकडे ठेवले होते. कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती. हे तुम्हाला माहितीये? ती माझी मावशी आहे, असेही सोनाली बेंद्रेने सांगितले. पुढे ती म्हणाली, राजकारणात येण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही. मला ते जमणार नाही.
30 वर्षांनंतर राज ठाकरे-सोनाली बेंद्रे भेटले होते
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यातील सोनाली बेंद्रे यांच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. 1996 साली मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले. त्यानंतर 30 वर्षांनी हे दोघे भेटले होते. त्यानंतर या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला. त्यावर सोनालीने भाष्य केले.