दिव्यातील सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेची मशाल हाती घेतली, रोहिदास मुंडेंचे विरोधकांना चपराक

Spread the love

ठाणे : (निलेश घाग) मला गद्दार की खुद्दार म्हणून विचारणाऱ्यांनी स्वतः आधी आरशात पहावं.त्यांनी भाजप मंडल अध्यक्ष पदावर असताना पक्षाशी गद्दारी केली आणि मी पक्षातून बाहेर पडावं म्हणून षडयंत्र करून माझं पद काढून घेतले गेले,शिंदे गटासमोर लोटांगण घालणारे स्वार्थीच आहेत मी दिव्यातील जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला असे सणसणीत उत्तर रोहिदास मुंडे यांनी श्री.निलेश पाटील यांना दिले आहे.

जिनके घर शिशे के होते है, वह दुसरो के घर पत्थर फेका नही करते ; रोहिदास मुंडे

दिव्यात शिंदे गटाच्या विरोधात आवाज उठवणारा विरोधी नेता नको म्हणून माझे पद काढून घेण्यासाठी कुणी कुणी काय काय षडयंत्र केल हे ठाणे शहरात जगजाहीर आहे. भाजपच्या मंडळ अध्यक्ष चे पद जाणार हे शिंदे गटातील ठराविक लोकांना दोन महिने आधीच माहित होते. याचा अर्थ असा होतो की शिंदे गटाच्या इशाऱ्यावर दिव्यात भाजप चालवली जात होती. एकीकडे मी दिव्यातील सामान्य जनतेचा आवाज बुलंद करत होतो, सत्ताधाऱ्यांना सातत्याने प्रश्न विचारत होतो म्हणून मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न काहींनी केला. म्हणुनच दिव्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी मी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.दिवा शहरातील अन्यायाला यापुढे वाचा फोडण्याचे काम मी सातत्याने करत राहीन.

“अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी…”
“असा कसा जो तो येथे होतसे खरेदी…”
“अपार दुःखाचीही चालली दलाली…”
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

:- रोहिदास मुंडे

ज्या पद्धतीने मी पक्षातून बाहेर पडावे यासाठी षडयंत्र केले गेले ते पाहता पदावर असताना पक्ष सोडणाऱ्यांशी माझी तुलना होऊ शकत नाही. माझा लढा हा प्रामाणिकपणे दिवा शहरातील जनलोकांच्या हितासाठी आहे. दिव्यात शिंदे गटाच्या विरोधात लढण्यासाठी खंबीर पाठिंबा आणि भूमिका घेणारा पक्ष दिव्यात असणे गरजेचे आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातूनच हे शक्य आहे, यासाठी मी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला आहे असे सणसणीत उत्तर रोहिदास मुंडे यांनी विरोधकांना दिले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page