
राजापूर /प्रतिनिधी- सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खैर यांनी राजापूर मध्ये अनधिकृत खोदकाम केल्याचे पुराव्यासह सिद्ध केले आहे . त्यासंदर्भातला पत्र व्यवहार माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केला आहे . राजापूर मधील प्रतिष्ठित उद्योजक तथा राजकारणी श्री. जमीर निजामुद्दीन खलिफे माझी नगराध्यक्ष यांच्या मालकीच्या मौजे कोदवली येथिल स. नं.२४/१क्षेत्र २.४४.०० हे.आर पो.ख ०.०६८.५८ हे.आर एकूण ३.१२.५८ हे. आर या जागेमध्ये अनधिकृत रित्या माती उत्खनन करून शासनाचे मोठ्या प्रमाणात महसूल नुकसान केले आहे. ह्या बाबत वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे. उलट मा. उपसंचालक, भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय महाराष्ट्र शासन कोल्हापूर श्री कांबळे योग्य प्रतिसाद देत नाहीत असे राजापूर तहसीलदार ह्यांचं म्हणणं आहे. पण ह्या व्यतिरिक्त माझे असे म्हणणे आहे की तहसीलदार राजापूर ह्यांच्या कार्यालयातील अधिकारी हे अनधिकृत उत्खनन करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहेत उदा ( अमोल प्रकाश ढोले लिपिक खनीकर्म विभाग ) ह्यांच्या कडे कोणतीही तक्रार केली की त्याच्यावर कारवाई करीता तहसीलदार ह्यांच्या पर्यंत जाताच नाही आणि ह्यांचे लागे बांधे असल्या मुळे कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.
जमीर खलिफे यांनी मौजे कोदवली येथिल स. नं.२४/१क्षेत्र २.४४.०० हे.आर पो.ख ०.०६८.५८ हे.आर एकूण ३.१२.५८ हे. आर या जागेमध्ये ६० ते ७० हजार ब्रास माती उत्खनन करून ७ डोंगर भुईसपाट करून ठेवले तरी एकाही अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही. ह्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचे जमीर खलिफे ह्यांच्या सोबत ह्यांचे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे समजते. ६० ते ७० हजार ब्रास माती उत्खनन करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे. ह्या बाबत तत्कालीन तहसीलदार शीतल जाधव, लिपिक अमोल ढोले, ह्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी. राजापूर मध्ये ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केलेली आहे. ह्याची सुद्धा चौकशी व्हावी.
दिनांक २० एप्रिल २०२५ पर्यंत संबंधित सर्व अधिकारी व जमीर खलिफे ह्यांच्या वर महसूल अधिनियम प्रमाणे कारवाई करून बुडवलेला महसूल दंडासह वसूल न केल्यास मी दिनांक २१/०४/२०२५ पासून महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे ह्यांच्या मुंबई येथील बंगल्यासमोर आमरण उपोषण तथा आत्मदहन करेन ह्या सर्व बाबीला जिल्हा प्रशासन तथा महसूल विभागाचे अधिकारी जबाबदार असतील त्यांनी पत्रद्वारे कळविले आहे.