
संगमेश्वर :अर्चिता कोकाटे/ नावडी- नावडी येथील कायदासाथी तसेच पैसा फंड हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. दिनेश हरिभाऊ अंब्रे यांनी आपल्या आईला वंदन केल्यानंतर आपण माध्यमिक शिक्षण व संस्कार घेतलेली प्रशाला पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे जाऊन संस्थेचे सचिव श्री. धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिन देव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांना ‘ प्रार्थना ‘, ‘ हसती दुनिया’ ही पुस्तके व पुष्प देऊन गुरुजनांचा आदर केला. प्रशालेत गतवर्षी पाचवी शिकणाऱ्या विजय लालासो टकले याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.
हा विद्यार्थी क्रीडा व कला अशा क्षेत्रात देखील अग्रेसर असतो. तसेच प्रज्ञा गणपत कांबळे या विद्यार्थिनीला देखील एन एम एम एस परीक्षेची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा दिनेश अंब्रे यांनी शालेय भेटवस्तू देऊन सन्मान केला व भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रशालेचे शिक्षक वृंद व ग्रामसेवक दत्तात्रय टकले आधी यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशालेतील गुरुजनांविषयी आदर,निष्ठा व कृतज्ञता व्यक्त केलेली दिसून येते.