संगमेश्वर :- प्रतिनिधी (दिनेश आंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील तेरे टाकेवाडी येथील मानाचे स्थान असणाऱ्या गुरव घराण्यातील सासर वाशीण किशोर गुरव यांची पत्नी सौ स्नेहल किशोर गुरव यांनी गेली वीस वर्षे संगीत क्षेत्रात च्या माध्यमातून गायनाचे परंपरा जपली आहे.शारदीय नवरात्रोत्सवाच्या पर्वावर सौ स्नेहल गुरव च्या गायनासाठी श्री गणपती मंदिर (नावडी) संगमेश्वर गणेश आळी येथे आल्या होत्या.
माहेरी पूर्वाश्रमीच्या जयश्री श्रीधर लिंगायत या शाळेत शिकत असताना गायनाची आवड निर्माण झाली त्यावेळी संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर यांचे अभंग गवळणी त्या म्हणत असत गाव कोळीसरे येथील वडील श्रीधर गोपीनाथ लिंगायत व आई कै. शुभांगी हरिचंद्र लिंगायत यांच्या समवेत विविध मंदिरात उत्सवाच्या वेळी जाऊन अभंग गाणे भजन करणे असे करत असत शिक्षण घेत असताना आई-वडील यांचे प्रोत्साहन यामुळे कला वाढीस लागले व पुढे विवाह नंतर गुरव घराण्यात पती श्री किशोर गुरव यांचा भक्कम पाठिंबा नेहमीच मिळत राहिला घरातील मंडळी स्नेहल यांच्या पाठीशी सदैव असल्यामुळे त्या अधिक प्रोत्साहनाने व स्फूर्तीने गेली वीस वर्षे गायन कलेची परंपरा जपत आहेत.
सोळजाई मंदिर देवरुख श्री गणपती मंदिर संगमेश्वर श्रीदेवी निनावी माता भंडारवाडा नावडी आधी विविध गावातील देवींच्या दरबारात गायनाचे कार्यक्रम झालेत.
सौ.स्नेहल यांच्या पहिल्या गुरु आई शुभांगी हरिश्चंद्र लिंगायत तर दुसरे गुरु कडवई गावचे प्रतिष्ठित नागरिक गुरुवर्य श्री राजेंद्र घोसाळकर हे होत. सौ. स्नेहल यांनी पुढील भावी जीवनात उत्तरोतर प्रगती करत संगीत क्षेत्रात दीर्घ वाटचाल करुन संगीत कलावंत म्हणून होण्याची मनीषा यांनी इच्छा बाळगली आहे हे त्या सांगतात.
श्री. गणपती मंदिर, गणेश प्रासादिक मंडळ (संगमेश्वर)यांची जवळ जवळ 200वर्षांची परंपरा आहे. असे समाजातील जेष्ठ कार्यकर्ते श्री.किशोर पाथरे सांगतात. या श्री. गणपती मंदिरात नवरात्रोत्सव च्या ‘अंखंड हरीनाम सप्ताह च्या निमित्ताने भगिनीचा सन्मान म्हणून उत्कृष्ट भजनकार सौ.स्नेहल किशोर गुरव यांचा प्रसिद्ध व्यापारी श्री.रमेश शेठ नारकर, सुभाष (बंधू)नारकर यांच्या उपस्थितीत गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विकास शेट्ये, तबला वादक नरेंद्र लिंगायत(गावमळा), हार्मोनियम वादक प्रदीप लिंगायत (परचुरी), कॅसिओ वादक, दीपक लिंगायत (तरवळ)आदी भक्तगणं उपस्थित होते. रमेश नारकर यांनी भावी वाटचालीस स्नेहल यांना शुभेच्छा दिल्या.