
धामणी | जानेवारी २३, २०२४.
भाजपा महिला मोर्चा, संगमेश्वर (उ.) च्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या उद्देशाने लघु उद्योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धामणी पंचक्रोशीतील सुमारे १०० महिलांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. ग्रा.पं. धामणीच्या बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदीकुंकूही झाले.
“आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महिलांनी सक्षम व्हावे यासाठी भाजपा महिला कार्यकर्त्यांनी काम करावे.” असा संदेश शक्तीवंदन कार्यशाळेत मिळाल्यानंतर भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्षा सौ. सुजाताताई साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे यांच्या नेतृत्त्वात आजचा कार्यक्रम संपन्न झाला. याकरिता राज फाउंडेशन, दापोलीचे श्री. संतोष गाठे यांनी मेणबत्ती, फिनेल, अगरबत्ती आदी व्यवसायांबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले.

भाजपा नेते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सह-प्रभारी, मा. आम. श्री. बाळासाहेब माने, भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, संगमेश्वर (उ.) तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, उपाध्यक्ष श्री. प्रशांत रानडे, सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, श्री. सतीश पटेल, श्री. मिथुन निकम आदींनी या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले. भाजपा कार्यकर्ते संगमेश्वर तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असतात.
या कार्यक्रमाला भाजपा संगमेश्वर (उ.) उपाध्यक्ष प्रशांत रानडे, सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, ग्रा.पं. धामणीचे सरपंच संतोष काणेकर, पंचायत राज सेलचे तालुका संयोजक श्री. रोशन पाष्टे, श्री. अल्ताफ नायकोडी, श्री. पर्शराम पाष्टे, महिला मोर्चा संगमेश्वर (उ.) तालुका उपाध्यक्षा सौ. सुमन झगडे, सरचिटणीस सौ. वैदही गुरव, चिटणीस सौ. स्वाती सप्रे आदी भाजपा पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
