जनशक्तीचा दबाव न्यूज | ओमान | फेब्रुवारी ०२, २०२३.
गेली चाळीस वर्षे विविध स्पर्धांत अनेकविध पदकांची लयलूट करणारे राजापूरचे सुपुत्र राजेश मुकादम यांनी नुकत्याच ओमान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेबल टेनिस मास्टर्स चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये दुहेरीमध्ये सहकारी असलेले कणकवली हरकुळचे सुपुत्र अनिल रासम यांच्या साथीने भारताचे प्रतिनिधीत्व करीत कांस्यपदक पटकावले.
सुमारे साठ देशांमधील २८०० स्पर्धक खेळाडूंचा सहभाग असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये राजेश मुकादम यांनी वयाच्या साठाव्या वर्षी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल.