सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी ‘अबोली ऑटो रिक्षा’ हि महत्त्वकांशी योजना जिल्हा बँकेने हाती घेतली आहे.या योजनेचा शुभारंभ शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सौ नीलम ताई राणे यांच्या हस्ते तर बँकेचे संचालक आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे.यावेळी ३ महिलांना अबोली रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली
या योजनेच्या द्वारे महिला जिल्ह्यात पिंक ऑटो रिक्षा चालवताना दिसणार आहेत व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीच्या व्याजदरात जिल्हा बँक अर्थसहाय्य करणार असून प्रशिक्षणासह, बॅच रिशा परमिटचा खर्च आमदार नितेश राणे स्वतः करणार आहेत जिल्हा बँकेने या योजनेसाठी ९% सवलतीच्या जाहीर केला असून किमतीच्या८५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक करणार आहे उर्वरित १५ टक्के कर्ज पुरवठा हा पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच,रिशा परमिट यासाठी लागणारा खर्च पहिल्या पाच महिलांसाठी आमदार नितेश राणे हे करणार आहेत.