मात्र नदीकाठी ठेवलेला गाळ पुन्हा पात्रात येणार

संगमेश्वर दि 25 प्रतिनिधी
संगमेश्वर जवळच्या माभळे येथे सोनवी नदीतील गाळ उपसा सुरू आहे मात्र गाळ उपसल्या नंतर गाळ नदीच्या काठावर टाकला जात असल्याने गाळ पुन्हा नदीमध्ये येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उपसलेला गाळ शासकीय जागेमध्ये टाकण्यात यावा तसेच महामार्गाच्या भरावासाठी उपयोग करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माभळे येथे सोनवी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरू आहे जलसंपदा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या गाळ उपशामध्ये नदीच्या काठीच गाळ टाकला जात असल्याने पावसाळ्यामध्ये सदरचा गाळ पुन्हा नदीमध्ये येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.गाळ उपसा ची यंत्रणा काम करत असताना सदरचा गाळ आणि वाळू शासकीय जागेमध्ये टाकण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. हा गाळ शासकीय जागेत टाकला गेला असता तर नदीतील गाळ पुन्हा नदीमध्ये गेला नसता . सोनवी नदीतील गाळ उपसा करण्यात येत आहे मात्र या गाळ उपसाकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसून योग्य समन्वय साधला जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या गाळ उपशाकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी होत आहे. तसेच डंपर मुळे रस्त्याचे दुरावस्था झालेली असल्याचे चित्र असून जाधव वाडीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो ओळी – सोनवी नदीत सुरू असलेला गाळ उपसा आणि नदीच्या काठावर टाकण्यात आलेला गाळ