
चिपळूण, ता. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने चिपळूण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेत ९०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा दोन प्रकारांमध्ये घेण्यात आली.
नमो युवा रन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मेडल, सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. चार गटांमध्ये खेळविल्या या संपूर्ण स्पर्धेत ७५ हजार रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्ह्याच्यावतीने करण्यात आले होते.
पाच किलोमीटर धावणे पुरुष गटात सिद्धेश बर्जे, सूरज कदम, ओंकार बैकर, यश शिर्के, स्वराज जोशी, महिला गटात खुशी हसे, प्रमिला पाटील, तन्वी मल्हार, कोमल मोहिते, श्रुतिका वरक यांनी अव्वल कामगिरी केली. तसेच तीन किलोमीटर धावणे मुलांच्या गटात शुभम शितप, पृथ्वी राजभर, रोहित राठोड, अथर्व दवंडे, आयुष बर्जे, सुजल घाणेकर, विपुल साळवी, विराज निवाते, तर मुलींच्या गटात इच्छा राजबार, उमेरा सय्यद, सानिका डिके, अनुष्का खेराडे, मंजिरी पावसकर, मृणाली खेराडे, श्रेया बने, वैभवी सोलकर, वैभवी ढगळे यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

“नमो युवा रन” मॅरेथॉन स्पर्धा चिपळूणमध्ये उत्साहात संपन्न;
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा आणि राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा रत्नागिरी व भारतीय जनता पार्टी रत्नागिरी यांच्या वतीने चिपळूण येथे “नमो युवा रन” या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले.

९०० होन अधिक स्पर्धकांचा सहभाग….
या मॅरेथॉनमध्ये ३ किमी व ५ किमी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ९०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा चार गटांमध्ये पार पडली असून, एकूण ७५ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विक्रमजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आणि बक्षीस वितरणप्रसंगी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा भाजपा नेते प्रशांत यादव, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, डॉ. तेजानंद गणपत्ये, डॉ. मनीषा वाघमारे, आंतरराष्ट्रीय धावपटू संध्या दाभोळकर, दक्षिण रत्नागिरी सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, उत्तर रत्नागिरी सरचिटणीस निलेश सुर्वे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, उदय घाग, अभय भाटकर, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष रुपेश कदम, माजी नगरसेवक विजय चितळे, आदी पदाधिकाऱ्यांसह विविध मंडल, महिला मोर्चा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा आणि युवा मोर्च्याचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पर्धेत यशस्वी संयोजनासाठी मंदार कदम, महेश तटकरे, स्वप्निल सुर्वे, प्रथमेश धामणस्कर, पंढरीनाथ तांदळे, वैशाली निमकर, रसिका देवळेकर, प्रतिज्ञा कांबळी, अपूर्वा बारगोडे, रत्नदीप देवळेकर, मंगेश रांगळे, अनिल सावर्डेकर, संदीप भिसे, यांच्यासह चिपळूण तालुका उपाध्यक्ष समीर पवार, महेश शिंदे, दिनेश आपिष्टे, आदी पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.



स्पर्धेचा संपूर्ण परिसर उत्सवमय वातावरणाने भारलेला होता. तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, आरोग्य आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
“नमो युवा रन” स्पर्धेमुळे चिपळूणमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा स्पर्धांमुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार व प्रसार होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

