
*श्रीकृष्ण खातू /धामणी-* संगमेश्वर तालुक्यातील शिव धामापूर भेलेवाडी येथील देवी जीवदानीचे भक्तीयुक्त श्रद्धा असलेले रामदास भोजने कुटुंबीयांनी स्वतः दहा वर्षांपूर्वी येथे जीवदानी देवीचे मंदिर बांधले असून दररोज पूजाअर्चा केली जाते. वर्षरभरात श्रद्धा असलेले अनेक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दर वर्षी हा दिन अनेक विधीने भोजने कुटुंब साजरा करतात.
महाराष्ट्रात विरार ( मुंबई ) डोंगरावर असलेल्या जागृत जीवदानी देवीच्या मंदिरात नियमित विधिवत पूजा करणारे जोशी गुरुजी हे या प्रसंगी उपस्थित राहून सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी भेलेवाडीतील देवतेवर अभिषेक, होम हवन, विधिवत पूजा, श्री सत्यनारायणाची पूजा, आरती असे विधी करून देवीचा दहावा वर्धापन दिन मंगलमय व पवित्र वातावरणात मोठ्या भक्ती भावाने अनेक भक्त जणांच्या उपस्थितीत पार पडला.

तीर्थप्रसाद ,महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू, उपस्थितांचे स्वागत ,सन्मान ,असे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पंचक्रोशी सह तालुक्यातून अनेक मान्यवर व्यक्ती माजी आमदार सदानंद चव्हाण, थोर समाज सेवक गणेश चाचे,अनुपमा चाचे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, चिपळूण नागरीचे तुषार खताते,बाळा पंदेरे, संभाजी महाडीक,सुबोध चव्हाण, उमेश चव्हाण, सुरेश गायकर, सुभाष भालेकर ,सिताराम टोपरे , गंगाराम टोपरे ,अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात ,भक्तगण उपस्थित होते. त्यांचा भोजने कुटुंबियांच्या वतीने यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात आला.


हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामदास भोजने पत्नी रेश्मा, मुलगा रोशन ,मुलगी स्वप्नाली , जावई सुमित मिरगल उभयता, धुमाळ उभयता ,तसेच भाऊ देवदास यांनी मेहनत घेतली होती.