धक्कादायक! ‘तुला पण संपवतोच’ म्हणत, पुण्यातील मनसे जिल्हाध्यक्षांवर झाला गोळीबार

Spread the love

पुणे | पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. तसेच गोळीबार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील आपल्या राहत्या घरासमोर असतानाच समीर थिगळे यांच्यावर आरोपींनी हा जीवघेणा हल्ला केला. ‘मी खेडचा भाई आहे. तुला माज आलाय. एकाला घालवलाय आता तुला पण संपवतो’ असे बोलत आरोपीने थिगळे यांच्यावर पिस्तुल रोखली आणि पैशांची मागणी केली. यावेळी कुटुंबीय समोर असतानाच थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

सांगण्यात येत आहे की, आरोपींकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र यावेळी सुदैवाने छातीवर फायरिंग होताना पिस्तुल न चालल्याने मोठा अनर्थ टळला. यानंतर आरोपींनी हवेत फायरिंग करत तिथून धूम ठोकली.

आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्यावर यापूर्वी मोक्का आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. तसेच, या जीवघेण्या हल्ल्यामुळे पुणे हादरले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page