चेंबूर: प्रतिनिधी (प्रणील पडवळ) शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाची ही गळती अद्याप सुरूच आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला.
एवढंच नव्हे तर माजी आमदार तुकाराम काते यांच्या पत्नी व बीएमसीच्या माजी नगरसेविका समृद्धी काते यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. तुकाराम काते हे मुंबईतील अणुशक्तीनगरचे माजी आमदार असून ते ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुख होते. तर समृद्धी काते या उपशाखाप्रमुख होत्या.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुकाराम काते म्हणाले, “मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि मुंबईच्या कायापालटात योगदान देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला.”
जाहिरात
जाहिरात