
संगमेश्वर /अर्चिता कोकाटे- नावडी येथील पोस्ट आळी येथील राहणारे शिक्षक श्री मंदार ऋषिकांत शिवलकर यांचे वडील कै श्री ऋषिकांत भिकाजी शिवलकर ‘ पुष्पांजली पेंटिंग्स ‘ हे वयाच्या 80 राव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन पावले.
त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1948 साली संगमेश्वर येथे झाला. त्यांचे वडील कै भिकाजी शिवलकर हे साधी राहणी मानण्यातले होते व पानाचा व्यापार करायचे त्यामुळे श्री ऋषिकांत यांना फारसे शिक्षण घेता आले नाही.पुढे काही वर्षांनी बोर्ड पेंटिंग करण्याची आवड निर्माण झाल्यामुळे चित्र रेखाटने, नेम पेंटिंग व गणपती कलेची जोपासना त्यांनी केली.
अनेक वर्ष त्यांना वॉलपीस बनवण्याची कला अवगत होती. जीवन वेलीवर चार मुली व मंदार आणि तुषार हे दोन मुलगे असे एकूण सहा अपत्ते होती. या सर्व मुलांची गणपती कामात मदत घेऊन सन 1984 साली गणेश कामास घरी सुरुवात केली. त्यावेळी कै स्मिता या सुविध्य पत्नीचे जीवनात मोलाची साथ लाभली. सर्व मुलांना उत्तम शिक्षण त्यांनी आपल्या कष्टातून व अथक परिश्रमातून दिले.
दत्तभक्त व गजानन महाराज यांच्या श्रद्धेतून सन 1994 साली पोस्ट आळीत उंबराच्या भल्या मोठ्या वृक्षाखाली श्री दत्त महाराजांना स्थानापन्न केले व पुढे काही वर्षानंतर हल्लीच त्याचे सुबक व आकर्षक मंदिराची जडणघडण केली. तसेच साई गजानन मंदिरात सदस्य म्हणून गेली अनेक वर्ष सेवाभाव व्यक्त केला आहे. संगमेश्वर येथील श्री निनावी आईच्या देवळातील मूर्ती रंगवण्याचे तसेच देवळाबाहेरील नंदी रंगवण्याची उत्तम सेवा त्यांनी बजावली.
आज पर्यंत पुष्पांजली पेंटिंग्स या नावानेच कार्यरत होते. प्रेमळ व मिश्किल स्वभावामुळे कुटुंबात तसे जावई व पाहुणेमंडळी व जनतेत लोकप्रिय होते.असे प्रेरणादायी प्रवास केलेले लोकप्रिय व समाजप्रिय व्यक्तिमत्व काही दिवस वृद्धापकाळाने राहत्या घरी आजारी होते.अल्पशा आजाराने सेवा कार्यात मग्न असलेले एक अनोखे ” कलारत्न ” काळाच्या पडद्याआड झाले आहे.त्यांच्या पश्चात मंदार व तुषार हे दोन मुलगे सून व नातवंडे आहेत.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*
