दिव्यात ठाणे महापालिका
अधिकाऱ्यांचा मनमानी
कारभार,शिवसेनेचे शैलेश पाटील
यांची महापालिकेच्या कारभारावर नाराजी

Spread the love

दबाव वृत्त : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिव्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध होऊनही मागील वर्षभरापासून नागरी सुविधा देण्यास ठाणे महानगरपालिका अधिकारी अपयशी ठरल्याचे सांगत शिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या दिव्यातील कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आळा बसावा अशी मागणी करत शैलेश पाटील यांनी दिव्यातील ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचला आहे. नालेसफाई नीट झालेली नाही,नाले साफ केल्यानंतर गाळ तसाच त्या ठिकाणी काढून ठेवल्याने पावसात पुन्हा तो नाल्यात जाऊन नाले भरण्याचे प्रकार होण्याची शक्यता असतानाही तो कचरा उचलला जात नाही असा गंभीर आरोप शैलेश पाटील यांनी केला आहे. काही ठिकाणी चांगले रस्ते असतानाही त्या ठिकाणी डांबरीकरण केले जात असून अशाने नागरिकांचा पैसा फुकट घालवण्याचे काम महानगरपालिका करत आहे. तर ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज आहे तिथे रस्ते केले जात नाहीत असेही पाटील यांनी म्हटले आहे. नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या मात्र ठाणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे लोकांना पाणी मिळत नाही असा आरोप शैलेश पाटील यांनी केला आहे.समस्या सुटत नसल्याने येथील जनता माजीनगरसेवकांना दोषी धरते, प्रशासन मात्र नामानिराळे राहते. दिवापश्चिमेला अजूनही रस्ता झालेला नाही. तेथील जागा मालकांना विश्वासात घेतले तर तिथे तोडगा निघून रस्ता होऊ शकतो. मात्र महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दिवा पश्चिम, दिवा स्टेशन परिसर या भागातील विकास कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शैलेश पाटील यांनी केला आहे. आम्ही माजी नगरसेवक आहोत हे लोकांनासांगून पटत नाही.लोकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी लोक आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात. मात्र महापालिका प्रशासन हे ढिसाळ

रस्ते केले जात नाहीत असेही पाटील यांनी म्हटले आहे. नवीन
जलवाहिन्या टाकण्यात आल्या मात्र ठाणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे लोकांना पाणी मिळत नाही असा आरोप शैलेश पाटीलयांनी केला आहे.समस्या सुटत नसल्याने येथील जनता माजी नगरसेवकांना दोषी धरते, प्रशासन मात्र नामानिराळे राहते. दिवापश्चिमेला अजूनही रस्ता झालेला नाही. तेथील जागा मालकांना विश्वासात घेतले तर तिथे तोडगा निघून रस्ता होऊ शकतो. मात्र महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दिवा पश्चिम, दिवा स्टेशन परिसर या भागातील विकास कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शैलेश पाटील यांनी केला आहे. आम्ही माजी नगरसेवक आहोत हे लोकांनासांगून पटत नाही.लोकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी लोक आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात. मात्र महापालिका प्रशासन हे ढिसाळ कारभार करत असल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. आम्ही सत्तेत असल्याने आम्हाला आंदोलन ही करता येत नाही अशी अडचण शैलेश पाटील यांनी बोलून दाखवली. एकंदरीत दिव्यात ठाणे महानगरपालिकेचा कारभार हा मनमानी असल्याचं सांगत शैलेश पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेला घरचा आहेर दिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page