शिवसेना नाव गेलं, चिन्हही गेलं, आता उद्धव ठाकरेंसमोर पुढचं संकट असणार.. ज्योतिष तज्ज्ञांनी वर्तवली भविष्यवाणी

Spread the love

मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

काळ तर मोठा कठीण आला, पण…

टॅरो मध्ये विविध कार्डस् असताता, जी जी कार्डस् समोर येतात, त्यानुसार त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. २०२३ या नव्या वर्षामध्ये महाराष्ट्राचे राजकीय अंतरंग जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये विविध महत्वाच्या राजकीय नेत्यांचे भविष्य समजून घेणार आहोत.

Uddhav Thackeray Astrology Lost Shivsena And Party Sign To Eknath Shinde New Big Tension As Per Tarot Card Reader

शिवसेना, धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरेंसमोर कष्टाचे डोंगर..

गेल्या वर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागून राहिले आहे. सुरुवातीस एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आणि भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही स्वतःचा हक्क सांगितला. निवडणूक चिन्हावरही हक्क सांगून उद्धव ठाकरे यांना जेरीस आणले. आता तर दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानेही शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना बहाल केल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणि अडचणींचे डोंगरच उभे असणार असे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. आता एका बाजूला न्यायालयात आणि दुसरीकडे रस्त्यावरही अशा दोन्ही पातळ्यांवर ठाकरे यांना संघर्ष करावा लागणार आहे.

सद्यस्थितीत टॅरोरुपी आरसा असे सांगतो की, भूतकाळात झालेल्या घटनांचा वर्तमानावर परिणाम होतो. आणि त्या त्या गोष्टी योग्य वेळेवर सावरल्या गेल्या नाहीत तर भविष्यावर सुद्धा त्यांचे गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत. २०२३ ते २०२५ ही वर्षे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूपच त्रासदायक आणि आर्थिक नुकसानीची सुद्धा आहेत. याकाळात एका मागून एक संकटे त्यांच्या दिशेने येताना दिसत आहेत. हीच वेळ आहे त्यांनी स्वतःला सावरायची. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही उक्ती लक्षात ठेऊन सर्व धुरा त्यांनी स्वतःच्याच हातात ठेवावी. हितशत्रू बरोबर ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे. कोणतीही गोष्ट अधिक ताणल्यास त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान संभवते.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page