
*संगमेश्वर-दि ३० सप्टेंबर-* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुचरी पंचायत समिती गण गाव बैठकीला प्रारंभ लोवले गावामध्ये घेऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
मुचरी गणाच्या गाव बैठकीची सुरुवात आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी लोवले येथील शुभ गंधा सभागृहातून करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा माजी राज्यमंत्री रवींद्र माने आणि रत्नागिरी जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा संघटक संतोष थेराडे आणि चिपळूण संगमेश्वर आणि वडाळा विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, संगमेश्वर उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, संगमेश्वर शिवसेना महिला आघाडी संघटिका मेधा कदम यांची उपस्थितीत पार पडली.
या बैठकीला रवींद्र माने यांनी मार्गदर्शन करते वेळी आजपर्यंत संगमेश्वरचा विकास हा खरा आपल्या माध्यमातून झाला. आज सर्वत्र रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पसरले आहे आणि याला कारण सध्याचे सत्ताधारी आमदार आहेत. हा रवींद्र माने कधी कंत्राटदाराला जाऊन भेटून कमिशन मागितला नाही. त्यामुळे विकास खऱ्या अर्थाने झाला. काही ठिकाणी पाण्याची समस्या होती त्यावेळी तेथील माझ्या माय भगिनींना दूर वरून पाणी आणावं लागत होत तर त्यांच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांना कायम स्वरूपी असलेली पाण्याची समस्या मिटवली होती. त्यावेळी एका ठिकाणी मला एकच मतदान झालं पण मी त्याठीकाणी देखील विकास केला कोणताही राजकारण न करता परंतु आताचे सत्ताधारी हे समाजकारणापेक्षा राजकारण जास्त करत आहेत तेव्हा यांना त्यांची जागा दाखवून देऊया.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी आपल्या मार्गदर्शनातं उपस्थितांना आपण आपला पक्ष संकटात आहे असे समजणे चुकीचं आहे आज आपल्या पक्षात तुमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिक असताना कोणाची हिम्मत नाही की ही शिवसेना संपवणे. आपला पक्ष निष्ठावान तसेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांवर प्रेम करणारा आहे.
संतोष थेराडे यांनी आपल्या भाषणात मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे कोणत्याही निष्ठावान शिवसैनिकांना आम्ही एकटे पडू देणार नाही. आमच्यात दोन हात करायची ताकत आहे तेव्हा सर्व शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा असे सांगितले.
तर उपतालुका प्रमुख घाणेकर यांनी शिवसेना संपवण्यासाठी खूप प्रयत्न सत्तेत बसलेले करत आहेत. पण ही शिवसेना संपवणे कोणाच्या हिम्मत नाही. या लोवले तसेच तालुक्यात संपवणे सोप्प नाही हे आजच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बैठकीवरून लक्षात येईल. त्यामुळे कितीही आमिषे दाखवून सुद्धा शिवसैनिक अजून जागेवर आहे आणि बाळासाहेब तसेच उद्धव साहेबांबरोवर आहे असे बोलून घाणेकर यांनी या बैठकीला ऊर्जा देण्याचे काम केलं.
या बैठकीला नावडी विभाग प्रमुख वैभव मुरकर, उपविभाग प्रमुख नथुराम पडवळ, उपविभाग संघटक सिद्धेश सावंत, तेर्ये गावचे जेष्ठ शिवसैनिक दादा बाईत, लोवले गावचे गौतम जाधव, राजू पवार, सुभाष पाचकले, शैलेश म्हस्के तसेच लोवले गावचे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी खासदार विनायक राऊत तसेच जिल्हा प्रमुख दत्ता कदम आणि संगमेश्वर तालुका प्रमुख बंडया बोरुकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोवले गावची शिवसेना शाखा कार्यकारिणी तयार करण्यात आली.
*सदर नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे*
शाखाप्रमुख श्री. सुभाष विश्वनाथ कदम, उपशाखाप्रमुख श्री. संतोष दिगू दोरकडे, उपशाखाप्रमुख श्री. जिवीत रावजी जाधव,बूथ प्रमुख श्री. सीताराम तानू पडये, B. L. A. श्री. मोहन रघुनाथ मोरे,गटप्रमुख श्री. नागेश रघुनाथ चव्हाण, शाखासंघटक श्री. दिलीप भार्गव कदम जाहीर करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे अभिनंदन उपस्थित मान्यवर आणि शिवसैनिकांनी केले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

