शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्यावतीने पालिकेच्या घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी रुग्णालय वैद्यकीय पथकाचा सत्कार

Spread the love

मुंबई (शांताराम गुडेकर )

                शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभा राऊळ यांच्या सूचनेनुसार व कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  दि.५/४/२०२३ रोजी संघटनेच्यावतीने मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी रुग्णालयात १७ मार्च २०२३ रोजी एका ३९ वर्षीय विवाहित महिला जीचे घरघुती भांडणातील प्राणघातक हल्ल्यात मानेवर वार केल्याने जखमी झालेल्या तसेच खोलवर जखम झाल्याने स्वरयंत्राला नुकसान पोहचण्याचा धोका निर्माण झालेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करत तिचे प्राण वाचवण्याबरोबरच तिच्या स्वरयंत्राला असलेला धोका टाळण्यात यश आले,आपत्कालीन प्रसंगात गांभीर्य लक्षात घेवून राजावाडी रुग्णालयातील कान,नाक, घसा वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.रितू के.शेठ यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय चमुने अवघ्या काही क्षणांत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.डॉ. देविका शेरे, निवासी वैद्यकीय अधिकारी पूर्णिमा कुमार,डॉ.सुब्रमण्यम अय्यर,डॉ.दीपिका चौधरी आणि भूलतज्ज्ञ डॉ. योगिता किंजाले, त्यांचे सहकारी डॉ. महेश डोंगरे या वैद्यकीय पथकाने युद्धपातळीवर शस्त्रक्रियेची कार्यवाही सुरु केली.अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आपत्कालीन स्थितीत करुन या महिलेला जीवदान तर दिलेच मात्र तिचे स्वरयंत्र वाचवून तिची वाचा देखील कायम राहीली याची दखल घेऊन सर्व वैद्यकीय पथकाला भेटून पुष्पगुच्छ,शाल देऊन सत्कार व कौतुक करण्यात आले. तसेच शवविच्छेदन इमारतीमध्ये प्रशासनाकडून तातडीने सदर जागेची दुरुस्ती करण्यात येत आहे.त्याची पोलीस सर्जन डॉ.के.स.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त व्हिजिट (पाहणी) करण्यात आली त्याप्रसंगी राजावाडीच्या वैधकीय अधीक्षिका भारती राजुलवाल,वरिष्ठ वैदकीय अधिकारी डॉ.सचिन पैयनावर,शवगृह वैद्यकीय अधिकारी डॉ.निशांत ठक्कर, शवगृह सहाय्यक,श्री.रघुनाथ तांबोळी, श्री.पांडुरंग नाईक, शिव आरोग्य सेनेचे उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे, महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ,मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक श्री.अमोल वंजारे, जालना जिल्हा संपर्क समन्वयक श्री.मकरंद राजहंस, मुंबई सचिव सौ.ज्योतीताई भोसले, मुंबई उपनगर (पू.) सहसमन्वयक श्री.प्रकाश वाणी, उपनगर (पू.) समन्वय सचिव श्री.शिवाजी झोरे, घाटकोपर (प.) विधा.समन्वयक श्री.विनायक कानसकर, नेवासा तालुका सचिव श्री.करण सरोदे, आरोग्य सैनिक श्री.हितेश गायकवाड, श्री.किशोर भिलारे, शिवसैनिक श्री.सचिन भांगे, श्री.विलास लिगाडे आणि श्री.चंद्रकांत हळदणकर, शवगृह लिपिक श्री.हेमंत रेड्डिज, शवविच्छेदन सेवक श्री.तुकाराम ठाकरे, शवगृह सेवक श्री.धनेश पाल आणि श्री.भास्कर जाधव उपस्थित होते

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page