मुंबई (शांताराम गुडेकर ) शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा राऊळ व कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार दि.०७/०४/२०२३ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त शिव आरोग्य सेना मुंबई यांच्या वतीने किरोळ गांवदेवी मंदिर,किरोळगांव,विद्याविहार (प.) मुंबई ४०००८६ येथे मोफत आरोग्य शिबिर पार पडले. यामध्ये शिबिरात मोफत मधुमेह चाचणी,रक्तदाब,संपूर्ण बॉडी चेकअप, नाडी परीक्षण,ऑक्सीजन लेवल चाचणी,वैयक्तिक आहार सल्ला,योगा मार्गदर्शन आणि मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले
सदर शिबिराचे उद्घाटन शिवसेना विभाग क्र.८ चे विभागप्रमुख श्री.सुरेश पाटील व शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री.पाटील साहेब यांनी सांगितले की पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिवसेना जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व चांगल्या आरोग्यासाठी अहोरात्र कटिबद्ध आहे तसेच शिव आरोग्य सेनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. चंद्रपाल चंदेलिया, मा.नगरसेविका सौ.स्नेहलताई मोरे,शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक श्री.अमोल वंजारे,जिल्हा समन्वय सचिव सौ.ज्योतीताई भोसले,मुं.उपनगर (पू.) सह-समन्वयक श्री. प्रकाश वाणी,शिवसेना उपविभाग समन्वयक श्री.विलास लिगाडे,विधा. सहसंघटक श्री.नरेश माटे,विधा. सह-समन्वयक श्री.हृदयनाथ राणे,आरोग्य सेनेचे उपनगर (पू.) समन्वय सचिव श्री. शिवाजी झोरे, ईशान्य मुंबई डॉक्टर सेल अध्यक्षा डॉ.शरिवा रणदिवे,घाटकोपर (प.) विधा.समन्वयक श्री.विनायक कानसकर, मानखुर्द विधा. समन्वय सचिव श्री.अभिजित देसाई,युवासेना उपसचिव श्री. मंदारभाई चव्हाण,उपविभाग अधिकारी श्री.विराज शिंदे,उपशाखाप्रमुख श्री.सुरेश करकेरा,श्री.राजा झगडे, सौ.निलमताई बने, युवतीशाखा अधिकारी कु. श्वेता जाधव,युनिकेअर हेल्थ सेंटरचे श्री.रमेश कांबळे, समाजसेविका सौ.वसुधा वाळुंज, सौ.वासंतीताई राणे,आरोग्य सैनिक श्री.हितेश गायकवाड, श्री.साक्षत म्हात्रे,श्री.दत्तराज आंब्रे,श्री.किशोर भिलारे, श्री.नाना भुते, श्री.महेश पोतदार,श्री. संतोष नेहरकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.