दिवा पूर्वेतील मध्य रेल्वेच्या पहील्या नवीन तिकीट घराचे शिवसेना प्रवक्ते,माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण

Spread the love

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळेच दिवा पूर्व ला तिकीट घर – अँड.आदेश भगत, अध्यक्ष दिवा रेल्वे प्रवासी संघटना

दिवा ( प्रतिनिधी) दिवा पुर्वेत सर्वाधित वास्तव्यास असलेल्या रेल्वे प्रवाशांची तिकीट घराची अडचण आता संपणार आहे.आज मध्य रेल्वेच्या सहकार्यामुळे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे नवीन तिकीट घराचे लोकार्पण ठाण्याचे माजी महापौर तथा शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांच्या हस्ते उत्साहपुर्ण वातावरणात झाले.तसेच पुढील काळात दिवा पूर्व मुंबई दिशेला पादचारी पुलावर आणखी एक नवीन तिकीट घर होणार असल्याने दिवा पूर्वेतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे

दिवा पूर्वेला तिकीट घर व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून दिवेकर रेल्वे प्रवाशांची होती.  खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकाळात दिवा रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला आहे. आज दिवा स्थानकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी नवीन फलाटाचे, स्वयंचलित सरकत्या जिन्याचे काम, शौचालय, पाणपोई आदी कामं सुरू आहेत. दिवा पूर्वेला एकही तिकीट घर नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. दिवा पूर्वेला पाहिलं तिकीट घर झाल्याने रेल्वे प्रवासी संघटना आणि दिवेकर रेल्वे प्रवाशांनी खासदार शिंदें यांचे आभार व्यक्त केले. नवीन तिकीट घराचं उदघाटन शिवसेना प्रवक्ते , मा.महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. 

 यावेळी शिवसेना शहर प्रमुख, मा. उपमहापौर रमाकांत मढवी, ग्रामीण संघटक ब्रह्म पाटील, उपशहर प्रमुख गणेश मुंडे, नगरसेवक अमर पाटील, दिपक जाधव, नगरसेविका सुनीता मुंडे, दिपाली भगत, दर्शना म्हात्रे, उपशहर प्रमुख, दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष अँड.आदेश भगत, दिवा शहर अधिकारी, युवती सेना कु. साक्षी मढवी,  विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, भालचंद्र भगत, गुरुनाथ पाटील, निलेश पाटील, शशिकांत पाटील, विनोद मढवी आदी कार्यकर्ते व दिवेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page