
मुंबई- आज खासदार संजय राऊतांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गजानन किर्तीकरांच्या भाजप आम्हाला सापत्न वागणूक देतेय, या वक्तव्यावर भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले,’गजानन कीर्तिकर हे आम्ही एकत्र असताना आमचे फार जवळचे सहकारी होते. त्यांनी सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायी होतं परंतु आज ते बोलत आहेत ते योग्य आहे.त्यांच्या गटाला सापत्न वागणूक मिळत आहे, हे आम्ही काय वेगळं सांगत होतो’.
‘भाजप बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी सापत्न वागणूक करत होती,म्हणून २०१९ ला शिवसेना वेगळी झाली. आतापर्यंत जे जे भाजपसोबत गेलेत त्यांच्यासोबत गेले त्यांना त्यांनी भाजपने खाऊन टाकलंय. आता त्यांना कळत असेल,या मगरींपासून दूर होण्याची शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती’.
राऊत पुढे म्हणाले,’जे फुटलेले आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. फूट झालेल्या गटामध्येच आता दोन गट पडलेले आहेत. भाजपने त्यांचा मूळ स्वभाव आणि त्यांची मूळ भूमिका सोडलेली नाही.जर गजानन कीर्तिकरांसारखा आमचा जुना सहकारी तिथे जाऊन सुद्धा सुखी नाही म्हणजेच भारतीय जनता पक्षांने कोंबड्यांचा खुराडा पाळला आणि एक एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे’.