ठाणे; नवी मुंबई शिवसेना शाखेच्या वतीने गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक सुरु करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी मा. रेल्वे मंत्री, मा. रेल्वे राज्यमंत्री व अखेर मा. पंतप्रधानांकडेही दिघा गाव रेल्वे स्थानक विलंब न लावता तत्काळ सुरु करा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली असून अखेर जनतेच्या प्रश्नासाठी व जनतेच्या हक्कासाठी आज ऐरोली व दिघा गाव रेल्वे स्थानकात सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिक व प्रवाशी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.