
पुणे :- ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना पक्षावरुन कायदेशीर लढाई सुरु असताना आज भाजप नेत्याने एक मोठं विधान केलं आहे. आमचा वडिलोपार्जित पक्ष आहे, असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यापुढे या विधानामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. ते म्हणाले की, बारामतीमध्ये आज होतो. कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर काम गरजेचं असतं. बारामतीच्या कार्यकर्त्यांना तेच सांगितले. बारामतीमध्ये जे चांगलं आहे त्याचं अनुकरण केलच पाहिजे. विधान परिषदेमध्ये पराभव झाला त्याचं विश्लेषण करत आहे. कुठे चुकलं त्याच विश्लेषण करू. नियोजनात त्रुटी राहिली असल्याची शक्यता असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
उद्धव ठाकेंबद्दल बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या देशात न्यायव्यवस्था आहे. दोन बाजू आहेत, तर्कवितर्क आहेत त्यामुळे योग्य-अयोग्य काय ते ठरेल. मुळात शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या एकट्याची नाही त्यांच्या दोन भावांची पण आहे.आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी मागणी होत आहे तर सुरक्षा देण्यासाठी एक समिती असते ती मूल्यांकन करून ठरवते. माजी सुरक्षा जेव्हा काढली होती तेव्हा अजितदादा यांनी टीका केली होती. आता हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षा मागत आहेत म्हणजे हा कुठला दुटप्पीपणा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जाहिरात :
