शिवसेना चिपळूण शहर पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न…
शिवसेना उपनेते, मा. आमदार श्री. सदानंद चव्हाण साहेब यांनी नियुक्ती पत्र देऊन भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा…

Spread the love

चिपळूण : शिवसेना चिपळूण शहर समन्वयक, उपशहर प्रमुख व महिला आघाडी उपशहर व विभाग संघटक आदी पदाधिकारी यांच्या नियुक्ती आज करण्यात आल्या. त्यामध्ये चिपळूण शहर समनव्यक पदी श्री. विजय उतेकर तसेच उपशहरप्रमुख पदी श्री.विक्रांत उर्फ विकी लवेकर (पेठमाप – गोवळकोट विभाग), अंकुश आवले (खेंड विभाग), सचिन हातिस्कर (बाजारपेठ विभाग), रविकांत कदम (काविळतळी – रावतळे विभाग), पृथ्वीराज पवार (मार्कंडी – रॉयलनगर विभाग), मधुकर मते (मतेवाडी – ओझरवाडी विभाग), संजय शिगवण (मुरादपूर -शंकरवाडी विभाग), इब्राहिम खान ( उक्ताड – मापारी मोहल्ला विभाग), सचिन शेट्ये (वाणी आळी – दादर मोहल्ला विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला आघाडी उपशहर संघटक पदी सौ.संजीवनी घेवडेकर (ओझरवाडी विभाग) व विभाग संघटक पदी सौ.तृप्ती कदम (पेठमाप विभाग), सौ.साक्षी लोटेकर (मुरादपूर विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना उपनेते तथा मा. आमदार श्री सदानंद चव्हाण साहेब, शिवसेना तालुकाप्रमुख श्री.संदेशबापू आयरे, श्री. करामतशेठ मिठागरी, महिला आघाडी जिल्हा संघटक सौ.रश्मीताई गोखले, शिवसेना शहरप्रमुख श्री. महम्मदभाई फकीर, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, महिला आघाडी शहर संघटक सौ. प्राजक्ता टकले, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, युवती सेना शहर संघटक शिवानी शिंदे व प्रमुख सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते तथा मा. आमदार श्री सदानंद चव्हाण साहेब व उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांचे हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला चिपळूण शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना आदी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page