दापोली : प्रतिनिधी (सैफ चौघुले)
शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत
दापोलीत शिवसेना आणि ठाकरे गटात जोरदार राडा झालाय. आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला आहे. त्यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिवसेनेच्या शाखा आमच्या असल्याचा दावा करत शेकडो कार्यकर्ते जोरदार घोषणा बाजी करत दापोलीतील शिवसेनेच्या शाखेत घुसले. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट समर्थकांनी ताब्यात घेतली. शिवाय आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
जाहिरात :