दिवा (प्रतिनिधी ) ढोल,ताश्या,लेझिम आणि शिवज्योत पेटवून दिव्यातील विविध विभागात आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शिवप्रेमींनी पारंपारिक वेशभुषा परिधान करुन दिवा आगासन रोड,साबेगाव,दातिवली,गणेशनगर,दिवा चौक येथून बाईक रॅली आणि शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणुक काढली.शिवप्रेमींनी आजच्या दिवशी जपलेले महत्व पाहता संपुर्ण दिवा शिवमय झाल्याचे दर्शन झाले.
19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रासह देशात रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.या दिवशी दिव्यासारख्या शहरात मोठे महत्व प्राप्त झालेले पहावयास मिळत आहेत.19 फेब्रुवारीच्या सकाळपासूनच दिव्यात नागरिकांनी घरोघरी शिवयांचे पोवाडे लावूले आहेत.ठिकठिकाणी चौकात महाराजांची प्राणप्रतिष्ठा आणि विधिवत पूजा करण्यात आली.तसेच शिवप्रतिमेचे पूजन केले असून त्यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
दिव्यात डाँ.श्रीकांत एकनाथ शिंदे मित्रमंडळ आणि दिवा प्रतिष्ठान मा.नगरसेवक शैलेश पाटील आयोजित, जाणता राजा मित्र मंडळ,सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ दिवा शहर,पुणे मावळ येथील संघटना,सातारा जिल्हा रहिवाशी संघ,श्री सचिन भोईर आयोजित श्री समर्थ मित्रमंडळ शिवजयंती उत्सव आदी मंडळांच्या भव्यदिव्य अश्या बाईक रॅलीही आज पहावयास मिळाल्या.यावेळी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या सणाला गालबोट लागू नये म्हणून विशेष पोलिस पथक मागविण्यात आले होते.यातील प्रत्येक मिरवणुकीत श्री ठाण्याचे माजी महापौर रमाकांत मढवी यांनीही हजेरी लावली होती.