

संगमेश्वर/ प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांनी आज शिव जयंतीचे औचित्य साधतं शोभा यात्राचे आयोजन केले होते. पंचक्रोशी मध्ये मुलांचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात येते . त्याला संगमेश्वर व्यापारी वर्गाने कडून कौतुक करण्यात आले आहे . शाळेतील चालीस विध्यार्थी या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. सदर शोभायात्रा चे आयोजन सुनील करंडे सर व त्यांच्या सहकार्य यांनी केला आहे . एक आदर्श उपक्रम राबवून लोकांसमोर ठेवला आहे. कोंड असुर्डे गावातील यामध्ये महिला वर्ग यांची लाक्षणिक उपस्थिती होती. पालकांच्या सहकार्यामुळे इतर शाळा बंद पडत असताना शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत आहे व प्रगती होत आहे त्यामुळे पालकांचे ही कौतुक होत आहे. आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून इतर शाळांपेक्षा वेगळा उपक्रम राबवून प्रत्येक वेळी शाळा पुढे राहिलेली आहे. माजी विद्यार्थी शोभा यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
https://x.com/JDabav18232/status/1892430333947134239?t=cZZnGmIU-qDsZYoPEjI80w&s=19



आदर्श जिल्हा परिषद विद्या मंदिर कोंड असुर्डे ७५ वा वर्धापन दिन साजरा, माजी विद्यार्थ्यांनी घेतली मेहनत
आदर्श जिल्हा परिषद विद्या मंदिर कोंड असुर्डे ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. विविध कार्यक्रम तसेच तीन दिवस कार्यक्रम करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांनी उत्तम नियोजन करून ७५ वा वर्धापन दिन सुंदर रित्या साजरा केला. माजी विद्यार्थ्यांचे सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले आहे. या प्राथमिक शाळेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन सातत्याने होत आहेत.त्यातच शिवजयंती चे औचित्य साधून शिवशोभा यात्रेचे आयोजन करणेत आले होते. क्रीडा कला तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये शाळेतील विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे शाळेचा प्रत्यही सुधारले आहे.
https://x.com/JDabav18232/status/1892430333947134239?t=uLb1jhKt19cfzvh81icvvg&s=19


अनेक वर्ष शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत
संगमेश्वर बस स्थानक येथून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातून शोभा यात्रेला ढोल पथक,आणि लेझीम नृत्याने शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रा पुढे सरकत होती. शोभा यात्रेमध्ये जय भवानी जय शिवाजी घोषणांनी संगमेश्वर बाजारपेठ सहित कोंड असुर्डे परिसर दुमदुमला होता व एक वेगळ्या प्रकारची वातावरण निर्मिती झाली होती. शाळेची प्रत्येक क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती व सर्वांगीण विकास होत आहे .शाळेतील विद्यार्थिनी कु.शुभ्रा शेटे, तालुका नासा मध्ये घवघवीत यश तर सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा खो खो संघात कु.मुद्रा रहाटे हिची चमकदार कामगीरी केलेली आहे . शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने भविष्यात शाळेला आय. एस. ओ. नामांकन मिळविण्याकरिता शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ यांचं प्रयत्न चालू आहेत .

https://x.com/JDabav18232/status/1892426566845517990?t=uDP2Dxb3oXyahqg-wFgmjQ&s=19
शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षकांनी मानले सर्वांच्या आभार
सर्व लोकांकडून कोंड असुर्डे शाळेचे कौतुक करण्यात येते आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांच्या कडून देखील शिवजयंती निमित्त विविध वेशभूषा करून शिवशोभा यात्रा काढल्या बद्दल मुलांचे विशेष कौतुक करण्यात आले. शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षक यांनी ग्रामस्थ व रॅलीमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले आहेत असे उपक्रम समाजामध्ये वारंवार झाले पाहिजेत असे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने जीवनात घेतला पाहिजे. याची शिकवण जणू सदर रॅलीमध्ये मुलांना भेटली असेल व ऊर्जा मिळाली असेल.
https://x.com/JDabav18232/status/1892426566845517990?t=jE9r6c5KCisGL8LxT_j9KA&s=19

