
दिवा परिसरात शिवमय वातावरण
दिवा (प्रतिनिधी) अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त दिव्यात उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले असून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जाणता राजा मित्रमंडळयांच्यावतीने शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.याप्रसंगी दिवसभर दिवा शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

शिवजयंतीनिमीत्त जाणता राजा मित्रमंडळाच्यावतीने सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधीवत पूजा केली.दिवा शहरात यानिमीत्त येणाऱ्या विविध शिवज्योत व शोभायात्रा यांचे मोठ्या उत्साहात,फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.याप्रसंगी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम,सुमधूर भजने,मंगळागौर अश्या विविध कार्यक्रमांचा आश्वाद यावेळी हजारो शिवप्रेमींनी घेतला.सामाजिक क्षेत्रात असलेले व सध्या टाटा हाँस्पीटल येथे कार्यरत असणारे तेथील रुग्णांना मोफत जेवण पुरविणारे समाजसेवक श्री जय होलमुखे यांचा विशेष सत्कार जाणता राजा मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आला.
त्याचबरोबर गेटवे आँफ इंडिया ते गुवाहाटी असा २७५० किलोमीटरचा प्रवास सायकलवरुन २६ दिवसांत करणाऱ्या कु.कृतिका बिर्जे या सुकन्येचा सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री समीर चव्हाण शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य,तसेच रयतेचे राज्य छत्रपती शिवरायांनी कसे निर्माण केले याबद्दल विचार व्यक्त केले.याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र आंब्रे,श्री प्रशांत चव्हाण,श्री उदय सावंत,श्री विघ्नेश सुर्वे,श्री सुशांत अर्धापुरे,श्री जय आंब्रे,श्री महेंद्र आंब्रे,श्री प्रशांत अर्धापुरे,श्री प्रतिक विचारे,श्री अभिजित सुर्वे,श्री नारायण चव्हाण,श्री विकी कदम,श्री अरविंद ढेकळे,श्री रामचंद्र आंब्रे,श्री रामापती पांडे,श्री दिपक मोंडे,श्री.सुनिल चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी तसेच बहुसंख्य कार्यकर्ते,महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


