
रायगड : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावलं आहे. यासाठी एसीबीने साळवी कुटुंबियांना नोटीस पाठवली आहे. साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस बजावण्यात आली आहे. साळवी कुटुंबाची २० मार्च रोजी रायगड येथील एसीबीच्या कार्यालयात चौकशी केली जाणार आहे.
आमदार राजन साळवी हे गेल्या दोन महिन्यांपासून एसीबीच्या रडारवर आहेत. याआधी तीन वेळा साळवी यांना चौकशीसाठी एसीबीने बोलावलं होतं. आता त्यांच्या कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. कुटुंबाला आलेल्या एसीबीच्या नोटीशीची माहिती स्वतः राजन साळवी यांनी माध्यमांना दिली.
