मिरजोळीतील श्रीमहालक्ष्मी साळूबाई देवस्थानच्या शिमगोत्सवास प्रारंभ

Spread the love

चिपळूण : शहरानजीकच्या मिरजोळी गावातील श्रीमहालक्ष्मी साळूबाई देवस्थानाचा फाल्गुन पोर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत संपन्न होणाऱ्या शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. शिमगोत्सवांतर्गत सोमवारी रात्री १०.०० वा. श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाई मंदीर परिसरातील सहाणेवर पालखी सजवण्यात आली.

मंगळवारी (दि. ७ मार्च) पहाटे ५ वा. श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिराजवळ भद्री होम, धुलीवंदनच्या दिवशी महालक्ष्मी मंदीर ते पवारवाडी येथे मिरवणूकीने आगमन. सकाळी ७ ते सकाळी ८ वा. श्री देवी महालक्ष्मी मंदिर ते पवार वाडी येथे मिरवणुकीने आगमन. सकाळी ८ ते १० वा. प्रथम मानकरी घरातील आरत्या घेतल्या जातील. सकाळी १० ते दु. ११ वा. दुसरे मानकरी घरातील आरत्या घेतल्या जातील. दु. ११ ते १२ वा. तिसरे मानकरी घरातील आरत्या घेतल्या जातील. दु. १२ ते ३ वा. मिरवणुकीने निघून दलवाई मोहल्ला मार्गे कोंढे सीमेवर जाताना त्या परिसरातील आरत्या. दु. ३ ते ४ वा. चौथे मानकरी घरातील आरत्या घेतल्या जातील. दु. ४ ते ५ वा. पाचवा मानकरी घरातील आरत्या घेतल्या जातील. सायं. ५ ते ६ वा. सहावा मानकरी घरातील आरत्या घेतल्या जातील. सायं. ६ नंतर मिरवणूकीने दत्तवाडी येथे आगमन सायं.०६ ते ०७ वा. सातव्या मानकरी घरातील आरत्या घेतल्या जातील. सायं. ७ ते पहाटे ०५ वा. पर्यंत दत्तवाडी येथील श्रीदत्त मंदिराजवळ स्टेजवर बसून ग्रामस्थ व भाविकांच्या आरत्या घेतल्या जातील.

बुधवारी (८ मार्च) पहाटे ५ ते सकाळी ७ वा. श्री दत्तमंदीरातून पालखी मिरवणुकीने भोरजेवाडी येथे सार्वजनिक स्टेजवर बसून तेथे ग्रामस्थ व भाविकांच्या आरत्या घेतल्या जातील. सकाळी ७ ते सकाळी ९ वा. खोरीवाडीतील स्टेजवर बसून ग्रामस्थ व भाविकांच्या आरत्या घेतल्या जातील. सकाळी ९ ते दु. १ वा. मिरवणुकीने पालखीचे माडवाडीतून वरच्या पवारवाडीतील स्टेजवर आगमन तिथे ग्रामस्थ व भाविकांच्या आरत्या घेतल्या जातील. दु. १ ते सायं ७ वा. वरच्या पवारवाडीतून खालच्या पवारवाडीत मिरवणुकीने आगमन, खालची पवारवाडी येथे भैरीच्या अंगणात स्टेजवर बसून त्या विभागातील ग्रामस्थांच्या व भाविकांच्या आरत्या घेतल्या जातील. सायं. ७ वा. नंतर पालखी चिपळूण शिमगा महोत्सवासाठी प्रयाण करेल. सायं ७ ते रात्रौ ९ वा. मिरजोळी रोहिदासवाडी येथे स्टेजवर बसून आरत्या घेतल्या जातील. रात्रौ ९ नंतर उक्ताड विभागातील आरत्यांसाठी प्रयाण काणसेवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी स्टेजवर बसून रात्रौ ९ ते १२ वा. पर्यंत त्या विभागातील आरत्या घेतल्या जातील. रात्रौ १२ ते पहाटे ६ वा. पर्यंत उक्ताड विभागात पारावर पालखी जाताना सालाबादप्रमाणे सिंगल आरत्या व नवस घेतले जातील. सकाळी ६ ते ७ मंगेश भोसले यांच्या घरी नवस व आरत्या होतील.

गुरुवारी (९ मार्च) सकाळी ७ ते सकाळी ९ वा. चिपळूण विभागातील आरत्यांसाठी प्रयाण. जाताना बडदेवाडी येथे सार्वजनिक स्टेजवर बसून त्या विभागातील आरत्या घेतल्या जातील कांगणेवाडीतून जाताना घरपट सिंगल आरती घेत श्रीगणपती मंदीर कांगणेवाडी येथे दु. २ वा. पर्यंत आरत्या व नवस घेतले जातील. दुपारी २ नंतर श्रीगणपती मंदिर कांगणेवाडी येथून प्रयाण पेटकर व परिसरातील संपूर्ण आरत्या व नवस घेतले जातील. नंतर कोलेखाजण विभागाकडे प्रयाण. कोलेखाजण विभागातील आरत्या व नवस. सायं. ६ ते रात्रौ ११ वा. सहाणेवरील मंदिरात घेतले जातील. रात्रौ ११ वा. ते पहाटे ०७ वा. कोलेखाजण येथे होळीच्या शेतात स्टेजवर बसून त्या विभागातील संपूर्ण आरत्या व नवस घेतल्या जातील.

शुक्रवारी (दि. १० मार्च) सकाळी ०७ ते दु. १२ वा. महालक्ष्मी नगरमधील आरत्यांसाठी प्रयाण करून महालक्ष्मी नगर येथे गोडेबाबा आंब्याजवळ बसून त्या विभागातील आरत्या व नवस घेतले जातील. दु. १२ नंतर श्रीमहालक्ष्मी नगरमधून प्रयाण करुन त्या विभागतील संपूर्ण आरत्या व नवस घेत महालक्ष्मी रेसीडंन्सी गृहनिर्माण सोसायटी, वैश्यभवनच्या मागील बाजूकडे बसून त्या विभागातील आरत्या व नवस घेतले जातील. शनिवारी (दि. ११ मार्च) सकाळी ०७ नंतर महालक्ष्मी रेसीडंन्सी गृहनिर्माण सोसायटीमधून श्रीजाखमाता मंदिराजवळ आगमन. स. ७ ते रात्रौ ११ वा. पर्यंत श्रीजाखमाता मंदिराजवळ आगमन व तेथे स्टेजवर जाखमाता मंदिराजवळ दिवसभर बैठी बसून त्या विभागातील आरत्या घेतल्या जातील. रात्रौ ११ वा. नंतर श्रीजाखमाता मंदिरापासून प्रयाण. तेथून मिरवणूकीने संपूर्ण रात्रभर आरत्या.

रविवारी (दि १२ मार्च) सकाळी स. ६ ते ८ वा. पर्यंत खेण्ड भाटीया गॅरेज समोरील स्टेजवर बसून त्या विभागातील आरत्या घेतल्या जातील. सकाळी ८ ते दु. २ वा. पर्यंत भाटीया गॅरेज ते गणपती मंदिर चौकीत बसून खेण्ड चौकीपासून जुन्या गुहागर नाक्यापर्यंतच्या विभागातील संपूर्ण आरत्या व नवस घेतले जातील. दुपारी २ वा. ते सायं. ५ वा. खेराडे यांचे घरच्या अंगणात बसून उक्ताड विभागातील संपूर्ण विभागातील आरत्या व नवस घेतल्या जातील. सायं. ५.३० नंतर मिरवणूकीने निघून मिरजोळी साई मंदिर पवारवाडी मार्गे श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाईच्या मंदिरात आगमन. रात्रौ १२ वा. श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाई मंदिर परिसरातील सहाणेवर ललिताने शिमगोत्सवाची सांगता होईल. या शिमगोत्सव सोहोळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाई देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page