
अलोरे : परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय आणि सी. ए. वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अलोरे चे मुख्याध्यापक श्री शरद नथू सोळुंके यांना यावर्षीचा ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्य, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, नवोपक्रमशील नेतृत्व आणि सर्वांगीण गुणवत्तावृद्धीतील योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण समारंभाला प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार संजय केळकर, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण पदवीधर आमदार अॅड. निरंजन डावखरे, तसेच माजी खासदार व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
मुख्याध्यापक शरद सोळुंके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धी, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे सशक्त नियोजन, डिजिटल साक्षरता, नवोपक्रमशील शिक्षण पद्धती आणि पालक-शाळा समन्वय या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने अनेक शैक्षणिक कामगिरी साध्य केल्या आहेत.
पुरस्कार स्वीकारताना श्री. सोळुंके म्हणाले,
“हा पुरस्कार माझ्या सहकारी शिक्षकवर्ग, पालक, विद्यार्थी आणि संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच शक्य झाला आहे. हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण शाळेचा आहे.”
कार्यक्रमाला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक शिक्षणसंस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार घोषणेनंतर अलोरे आणि पोफळी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, मुख्याध्यापक शरद सोळुंके यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*