संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात आज बुधवारी सकाळी बरोबर ७ वाजता श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडीवर सूर्य किरणांनी शंभू महादेवांना सोनेरी सचैल किरणांचे स्नान घातले. वातावरणात पसरलेला भक्तिभाव आणि मंदिराच्या गाभाऱ्यात सर्वत्र पसरलेला सोनेरी प्रकाश असा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती . आज ६.४७ वाजता सूर्योदय झाला आणि पुढील दहा – बारा मिनीटातच किरणोत्सवाचा सोहळा पहायला मिळाला .