कोकण रेल्वेच्या संगमेश्‍वर रेल्वेस्थानकात भीषण पाणी टंचाई

Spread the love

संगमेश्वर : संगमेश्‍वर रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून संगमेश्‍वर रेल्वेस्थानकात येणारा प्रवासी वर्ग हैराण झाला आहे.
शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाला आले होते. ते परतीच्या मार्गाला निघाले असल्याने त्यामुळे रेल्वे स्थानकात गर्दी असते. मात्र या ठिकाणी पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नसल्याने स्टेशनवरील स्टॉल धारकांकडे पिण्याचे पाणी घेण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच रेल्वे स्थानकामधील स्वच्छतागृहामध्येही अस्वच्छता दिसून येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page