नेरळ: सुमित सुनिल क्षिरसागर नेरळ गावातील पाडा विभागात असलेल्या राजबाग या भागाला नेरळ ग्रामपंचायत कडून दररोज होणाऱ्या पाणी पुरवठ्यात काट मारली जात आहे.नेरळ ग्रामपंचायत कडून येथील 16 इमारतींच्या संकुलात जाणारे पाणी व्हॉल्व बंद करून अडवले जात असल्याने येथील रहिवाशांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत.दरम्यान,नेरळ गावातील सर्व भागात मुबलक पाणी पोहचत असताना सर्वाधिक पाणी पुरवठा असलेल्या भागातील राजबाग मधील इमारतींमध्ये दररोज सकाळी पाणी उपलब्ध नसते. नेरळ नळपाणी योजनेची मुख्य मार्गिका ही जलशुध्दीकरण केंद्र येथून पुढे पाडा विभाग मधून सर्वात आधी पुढे पुढे जात असते. त्यामुळे हा परिसर नेरळ गावातील पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सर्वात सुपीक भाग समजला जातो. त्यामुळे या भागात घर घेवून रहण्यावर सर्वांची पसंती असते.या भागात मुंबई पुणे मेन रेल्वे लाईन आणि नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गिका यांच्या मधोमध राजबाग हे ग्रहसांकुल उभे राहिले आहे.तेथे सध्या 200हून अधिक कुटुंब राहत असून गेली 15 दिवस येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.यापूर्वी भरपूर पाणी असलेल्या या भागात गेल्या अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचे टँकर पैसे खर्च करून आणावे लागत आहेत.या संकुलात नेरळ ग्रामपंचायत कडून पाणीपुरवठा होत असून या ठिकाणी असलेल्या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.असे असताना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. येथील रहिवाशी फेडरेशन कडून पिण्याचे पाणी का कमी येते याचा अभ्यास केला. त्यावेळी माथेरान नेरळ कळंब रस्त्यावर या संकुल बाहेर असलेल्या पाडा विभागात पाण्याच्या वितरण करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व लावण्यात आले आहेत.त्या ठिकाणी असलेले पाणी येणारे व्हॉल्व हे नेरळ ग्रामपंचायत ने राजबाग परिसराला कमी पाणी जावे यासाठी लावले आहेत.दरोराज सकाळी पाणी सोडल्यानंतर एक तास झाल्यावर नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी येथे येवून राजबाग मध्ये पाणी जाणाऱ्या वाहिनीचे व्हॉल्व बंद करून जातो. त्याचा परिणाम राजबाग मधील रहिवाशांसाठी असलेली पाण्याची टाकी ही जेमतेम दोन फूट भरलेली असते.त्यामुळे दररोज पहाटे रहिवशांच्या घरातील नळाचे पाणी गेलेले असते.त्यामुळे ही व्हॉल्व बसविण्याची आयडिया नेरळ ग्रामपंचायत कडून राबविली आहे.त्याचा परिणाम राजबाग संकुलासमोर पाण्याचे व्हॉल्व बंद करून पाणी टंचाई ची परिस्थिती निर्माण केली जात आहे.ही पाणी टंचाई एकट्या राजबाग परिसरात नेरळ ग्रामपंचायत कडून निर्माण करण्यात आलेली आहे.नेरळ ग्रामपंचायत कडून हा राग राजबाग संकुलातील रहिवाशी यांच्यावर का काढला जात असल्याने स्थानिक रहिवाशी नाराज आहेत. नेरळ गावातील अन्य भागात पिण्याच्या पाण्याची समस्या नसताना सर्वाधिक पाणी पुरवठा होणाऱ्या पाडा विभागातील एका मोठ्या संकुलाचे पाणी नेरळ ग्रामपंचायत ने व्हॉल्व लावून अडवले असल्याने त्याचे गुपित रहिवशी यांना आजपर्यंत समजले नाही.मात्र नेरळ ग्रामपंचायत कडून बसविण्यात आलेल्या व्हॉल्व मुळे राजबाग विभागातील रहिवाशी पिण्याच्या पाण्याची टंचाई मध्ये दिवस काढत आहेत.याबाबत नेरळ ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर तसेच उप सरपंच मंगेश म्हसकर यांच्याकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत.