
मुबंई- पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुबंईच्या दिशेने ही वाहने जात होती. तेवढ्यात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरघाटात आली असता हा अपघात झाला आहे, या अपघातात एक ट्रक, तीन बस आणि तीन कारचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
रायगड : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांच सत्र सुरू आहे. शनिवारीही (24 मे) झालेल्या एका भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुबंई- पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास सात वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू आहे, तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. मुबंई- पुणे एक्सप्रेस वेवर सात वाहनांचा हा विचित्र अपघात पाहून एकच गोंधळ माजला होता.
या अपघातात 17 वर्षीय मुलीसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, हेल्प फाउंडेशन यांचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघात ग्रस्त वाहनांमध्ये अडकेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळील उतारावर कंटेनर पुढे जाणाऱ्या सात वाहनांना धडकून हा विचित्र अपघातात झाला. या अपघातातील जखमींमध्ये तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
अक्षता अक्षय हळदणकर (वय 32, रा. कोल्हापूर), श्रेया संतोष अवताडे (वय 17, रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृत महिलांची नावे आहेत. वसुधा जाधव (वय 36), सारिका जाधव (वय 9), अवनीश जाधव (वय 3, तिघेही रा. कोल्हापूर), सारिका अवताडे (रा. घाटकोपर, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.
बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरच्या (एमएच 40 सीएम 1900) चालकाचे खोपोली एक्झिटजवळील उतारावर नियंत्रण सुटले. कंटेनर पाच कारला धडकून, पुढे स्विफ्ट कारला धडकला. यात स्विफ्ट कार (एमएच 10 डीजी 5146) ही पुढील खासगी बसच्या (जीए 08 व्ही 7279) खाली घुसली. त्यामुळे स्विफ्ट कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. इतर वाहनांमधील काही जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.