जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०५, २०२३.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व वर्धा जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा दि. १२ ते १४ जानेवारी दरम्यान स्पर्धा वर्धा जिल्हा मधील पुलगाव लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे होणार आहे. सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे ओम साई मित्र मंडळ येथील तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील सात खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरीता झाली आहे.
निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे : कु. अद्वेत सिंग. कु. सई सूवरे, कु. भार्गवी पवार, कु. योगराज पवार, कु. श्रृती काळे, कु. तुषार पाटील, कु. नूपुर दप्तरदार.
सर्व खेळाडूंना प्रशिक्षक श्री. तेजकुमार लोखंडे (२ दान ब्लॅक बेल्ट कोरिया), श्री. अमित जाधव (१ दान ब्लॅक बेल्ट कोरिया), महिला प्रशिक्षक सौ. शशिरेखा कररा, कु. मयुरी कदम (१ दान ब्लॅक बेल्ट) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग असणार आहे सदर राज्य स्पर्धेकरीता निवड खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर अध्यक्ष राम कररा रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री. वेंकटेश्वरराव कररा, जिल्हा महासचिव श्री. लक्ष्मण कररा (५ दान ब्लॅक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.