
संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावरील ओझरखोल हे ठिकाण अपघातांचे केंद्र बनले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची धूळ खाली बसत नाही तोच, गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा येथे दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात घडला आहे. या अपघातात परचुरी येथील 2 सख्खे भाऊ जखमी झाले आहेत. अथर्व चंद्रशेखर गुरव (21, परचुरी, ता. संगमेश्वर), शुभम चंद्रशेखर गुरव (21, परचुरी, ता. संगमेश्वर) असे गंभीर जखमी झालेल्या दोन्ही सख्ख्या भावांची नावे आहेत.
अपघातानंतर स्वामी समर्थ ॲम्ब्युलन्सचे दिपेश राऊत यांनी संगमेश्वर येथे दाखल केले. जखमी दोघांवर प्राथमिक उपचार करून रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, कार चालक रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने चालला होता. ओझरखोल आला दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील अथर्व आणि शुभम जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना दिपेश राऊत यांनी आपल्या ॲम्ब्युलन्सने त्वरित संगमेश्वर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र चार दिवसातच या ठिकाणी अपघात घडल्याने महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका वाहन चालकाना बसत आहे असे बोलले जात आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
