६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी “मुख्यमंत्री वयोश्री” योजनेचा लाभ घ्यावा….

Spread the love

रत्नागिरी, दि. 5 जुलै: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” लागू करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

या योजनेतून ज्येष्ठ नागरिकाना शारीरिक असमर्थतता / + दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. करिता एकरकमी रक्कम 3 हजार रुपये प्रति व्यक्ती पात्र बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट वितरण प्रणालीव्दारे लाभार्थीना लाभ मंजूर करण्यात येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page