राष्ट्रीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी साहिल घडशीची निवड…

Spread the love

✒️ जनशक्तीचा दबाव न्यूज

🛑 देवरूख | जानेवारी ३०, २०२३.

◼️ तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा दि. २६ ते २८ जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल जळगाव येथे मोठया उत्साहात संपन्न झाल्या.

◼️ या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व संगमेश्वर तालुका तायक्वांडो ॲकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लबच्या ४ तायक्वांडोपट्टुंनी सहभाग नोंदविला होता यामध्ये ४६ ते ४८ या वजनी गटातमध्ये साहिल शशांक घडशी अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले, राज रोशन रसाळ याने ७५ ते ७८ या वजनी गटातमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले .धनंजय देवीदास जाधव याने ४६ किलो आतील वजनी गटातमध्ये व राहुल सागर चव्हाण याने ५१ ते ५५ या वजनी गटामध्ये अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या साहिल घडशी याची निवड ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली आहे.

◼️ या खेळाडूंना शुभेच्छा देण्याचा छोटेखानी कार्यक्रम पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवली या ठिकाणी ॲकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहनजी बने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या वेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मिता लाड, तालुक्याचे माजी सभापती नंदादीप बोरूकर, युवा तालुका प्रमुख मुन्ना थरवळ, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने, क्लबच्या उपाध्यक्षा ॲड. सौ. पूनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब सदस्य पंकज मेस्त्री, स्वाती नारकर, रुपाली कदम, अनुजा नार्वेकर, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, अविनाश जाधव, सुमित पवार, आशिष रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

◼️ यावेळी जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणुन काम पाहणारे स्वप्निल सायबाना दांडेकर यांना सुद्धा ॲकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने यांच्या हस्ते गौरवण्यात आले. राज्याचे माजी राज्यमंत्री रविंद्रजी माने, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम, देवरुख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कदम, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचे महा सचिव श्री. मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) त्यांच्या यशाबद्दल राज्य संघटनेचे खजिनदार व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, अँकॅडमीचे अध्यक्ष परेश खातू, सदस्य अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, सिद्धी केदारी, गायत्री शिंदे, वेदांत गिड्ये आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page