रत्नागिरी – टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने सातवी राष्ट्रस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 2023 उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे दिनांक 22 जून ते 26 जून 2023 रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये रत्नागिरीतील मेघराज मनोहर पेजे, गणेश सुरेश वीर, प्रतीक प्रकाश पळसमकर, राहुल दिनेश गावाणकर, अनिकेत चंद्रकांत गावाणकर, संकेत संजय मांडवकर, आणि संचित देवू मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव यांनी दिली आहे.
निवड झालेल्या मुलांना 18 जून ते 20 जून 2023 रोजी नाशिक येथील मोदी मैदान या ठिकाणी महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या संघांची सराव चाचणी होणार आहे. सराव चाचणी घेण्यासाठी महाराष्ट्र सचिव सौ. मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे , विजय उंबरे , महेश मिश्रा , इंद्रजीत , संदीप पाटील , सिद्धेश गुरव, सुशील तांबे उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरीतील अनेक क्षेत्रातून मुलांचं अभिनंदन केलं जातं आहे. लांजा कुणबी पतपेढी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, माझे कोकण चे पत्रकार राहुल वर्दे , वनगुळे गावचे सरपंच प्रभाकर गुरव , मधुकर जाधव , अशोक गुरव, महादेव खानविलकर,सुरेश भालेकर, गणेश खानविलकर, महेश वीर, सुमित अनेराव,रोशन किरडवकर सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि प्रोत्साहन पर शुभेच्छा दिल्या.