रत्नागिरी : कोकणातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी होणार आहे.
शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्यासाठी कोकण रेल्वेकडून तीन होळी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणातून मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सणासुदीच्या काळात ही संख्या वाढते. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे जीवनवाहिनी आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने तीन गाड्यांची घोषणा केली. कोकण रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
कधी आणि कुठून सुटणार ट्रेन?
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून २६ फेब्रुवारी, ५ मार्च तसेच १२ मार्च या दिवशी रात्री १०.१५ सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी मडगावला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात मडगाव येथून २७ फेब्रुवारी, ६ मार्च, १३ मार्चला मडगाव येथून सकाळी ११.३० वाजता सुटून रात्री ११.२५ ला मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी तसेच करमाळी स्थानकावर थांबणार आहे. ही गाडी १७ डब्यांची धावणार आहे.
दुसरी विशेष गाडी पुणे जंक्शन ते करमाळी दरम्यान धावणार आहे. ही गाडी पुणे येथून २४ फेब्रुवारी, ३ मार्च, १० मार्च व १७ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सुटून गोव्यात करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक गाडी करमाळी येथून २६ फेब्रुवारी, ५ मार्च, आणि १९ मार्च रोजी सकाळी ९.२० ला सुटून रात्री ११. ३५ पुण्याला पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी स्थानकांवर थांबणार आहे. एकूण २२ डब्यांची गाडी असेल.
जाहिरात