
ठाणे: प्रतिनिधी ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल २७ रुग्णांचा मृत्यू झाला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले. त्यावर शिंदे म्हणाले की, राजकारण करू नका. शिंदेंच्या याच भूमिके वरून शिवसेनेने UBT त्यांना लक्ष्य केलंय. नाटक करून नका, असा चिमटा काढतानाच शिवसेनेने आरोग्य मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली.
१० ऑगस्ट रोजी ५, तर १३ऑगस्ट रोजी तब्बल १८रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी ४ रुग्ण कळव्यातील रुग्णालयात दगावले. या घटनेनं खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन केले. पण, यावर शिवसेनेने तिखट प्रतिक्रिया दिलीये
“ज्या हेलिकॉप्टरने मदतीच्या ठिकाणी तत्काळ गेल्याचे तुम्ही भासविता त्याच हेलिकॉप्टरने महाबळेश्वर येथून कळवा येथे यायला तुम्हाला किती वेळ लागला असता? मृत रुग्णांच्या दुर्दैवी नातेवाईकांचे अश्रूही पुसता आले असते. परंतु हे अश्रू सुकल्यावर मुख्यमंत्री तेथे पोहोचले”, असा टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाने लगावला आहे.
जाहिरात






