महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दुसरी अटक:फरार PSI गोपाळ बदने पोलिसांना शरण; मृत डॉक्टरवर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप….

Spread the love

सातारा- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. सध्या या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. दुसरीकडे, या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा रोष व्यक्त केला जात आहे.

मृत डॉक्टर फलटणला ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, त्याचा प्रशांत बनकर हा मुलगा आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वीच्या सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक बदनेने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला, असे म्हटले होते. तो फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असताना तोच शरण आला. दुसरीकडे या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, वडवणी (जि. बीड) तालुक्यातील मूळ गावी त्या महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार झाले.

पोस्टममॉर्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का?

मृत डॉक्टरच्या बहिणीने सांगितले की, मागील महिन्यात माझे तिच्याशी बोलणे झाले. ती म्हणाली, पोस्टमॉर्टेमसाठी माझ्यावर दबाव येत आहे. अनफिट असेल तर फिट म्हणून दाखवण्यासाठी दबाव येत होता. त्याला नकार दिल्यामुळे तिला त्रास वाढत गेला. आम्ही पाच पानांचे पत्र दिले. त्याची चौकशी झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. 80 ते 90 पोस्टममॉर्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? ती आत्महत्या करूच शकत नाही, असेही तिच्या बहिणीचे म्हणणे आहे.

पीडितेच्या तळहातावर इन्स्पेक्टर गोपाल बदने आणि प्रशांत बनगर यांची नावे लिहिलेली आढळली.
पीडितेच्या तळहातावर इन्स्पेक्टर गोपाल बदने आणि प्रशांत बनगर यांची नावे लिहिलेली आढळली.
अपर पोलिस अधीक्षक फलटणमध्ये ठाण मांडून

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने 23 ऑक्टोबर रोजी रात्री फलटण येथील एका लॉजवर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेच्या तपासासाठी अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर फलटणमध्ये ठाण मांडून आहेत, तर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही फलटणला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेने तळहातावर लिहिलेल्या मजकुरात प्रशांत बनकरवर मानसिक छळाचा आरोप केला होता. त्याला 24 ऑक्टोबर रोजी मित्राच्या फार्महाऊसवरून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा – माजी खा. रणजितसिंह निंबाळकर…

विरोधकांकडून लक्ष्य केले जाणारे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना कडक शासन करावे. त्या डॉक्टर भगिनीच्या मोबाइलचा सीडीआर तपासला पाहिजे. यातून अधिक सत्य बाहेर येईल.

महिला डॉक्टरला आलेल्या कॉलची चौकशी करावी – रामराजे निंबाळकर…

माजी खासदार निंबाळकरांचे कट्टर विरोधक महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. आत्महत्येपूर्वी त्या महिला डाॅक्टरला आलेल्या सर्व कॉलची सखोल चौकशी करावी.

निंबाळकरांच्या चौकशीची मागणी..

सातारा येथील जय भगवान प्रतिष्ठानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून चौकशी करावी. यात भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकरांचीही चौकशी व्हावी. निवेदनावर डॉ. प्रसाद ओंबासे, डॉ. रमाकांत साठे आदींच्या सह्या आहेत.


डॉक्टरांनी लिहिले – खासदाराचे दोन पीए रुग्णालयात आले

बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या महिला डॉक्टरने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे…

खासदाराचे दोन स्वीय सहाय्यक रुग्णालयात आले. त्यांनी इतर प्रकरणांमधील आरोपींना बनावट फिटनेस प्रमाणपत्रे देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. जे रुग्णालयात आले नव्हते त्यांना फिटनेस प्रमाणपत्रे देण्याची धमकीही त्यांनी दिली. मी नकार दिल्यावर त्यांनी खासदाराशी फोनवर संपर्क साधला.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव असल्याचा नातेवाईकांचा दावा..

डॉक्टरच्या नातेवाईकाने सांगितले की, अटक केलेल्या आरोपींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बदल करण्यासाठी आणि वैद्यकीय अहवालांमध्ये फेरफार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता.

डॉक्टरच्या चुलत भावाने सांगितले की त्यांनी या प्रकरणाबद्दल सातारा पोलिस अधीक्षक आणि डीएसपी यांच्याकडे तक्रार केली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी पत्रात लिहिले होते की, “जर त्यांना काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेईल?”

*दुसरा नातेवाईक म्हणाला*

कामाच्या ठिकाणी तिच्यावर मोठा दबाव टाकला जात होता आणि तिच्या वरिष्ठांकडून तिला त्रास दिला जात होता. तिने यापूर्वी तिच्या वरिष्ठ डॉक्टरांकडे या प्रकरणाबद्दल आणि पोलिसांकडून तिला येणाऱ्या समस्यांबद्दल तक्रार केली होती. तिला होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल तिने तक्रार केली होती. जर तिच्या तक्रारी ऐकल्या गेल्या नाहीत तर तिने आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती.

शनिवारी मुंबईतील केईएम रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी निदर्शने केली.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दार उघडले

एसपी दोशी यांनी सांगितले की, डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. कर्मचाऱ्यांनी दार वाजवले तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी वेगळ्या चावीने दार उघडले आणि ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*

*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*

*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page