🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | पुणे | जानेवारी ३१, २०२३.
◼️ बीबीसीने इंडिया – द मोदी क्वेश्चन नावाने केलेल्या डॉक्यूमेंट्रीची सद्या जोरदार चर्चा होताना दिसतीये. याच डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरुन जेएनयू (दिल्ली) आणि जामिया विद्यापीठात मोठा गदारोळ उडाला, आता तर याचे पडसाद थेट महाराष्ट्रात ही उमटलेत. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमध्येही ही डॉक्युमेंट्री दाखविण्यात आली. त्यामुळे यावरुन वाद वाढण्याची शक्यता आहे.
◼️ ही डॉक्युमेंटरी वादग्रस्त ठरली असून केंद्रीय प्रसारमंत्रालयाने डॉक्युमेंटरी बंद करण्याचे आदेश दिले होते. तरी देखील पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये 26 जानेवारी रोजी ही डॉक्युमेंटरी स्टुडंटस असोसिएशनतर्फे दाखवण्यात आली, या संदर्भात विद्यार्थ्यांनी परवानगी घेतली नसल्याचे एफटीआयआय प्रशासनाचं म्हणणं आहे.
◼️ पुण्यातली फिल्म अँड टेलिव्हिजन इ्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद देशपातळीवर उमटत असतात. ही डॉक्युमेंट्री विना परवानगी पहिली गेली असेल तर आता विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.