मुंबई : मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे.अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो आहेत. सयाजी शिंदे राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी ओळखले जातात. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून ठिकठिकाणी काम सुरु आहे.
आता याबद्दल सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमात सयाजी शिंदे सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी भारतात घटणाऱ्या वृक्षक्षेत्रावर आपलं मत मांडलं आहे.
वनदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात ‘झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे करा..वन कायदे रिवाईस झाले पाहिजे..’ अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी बोलताना वृक्ष लागवडीसह इतर 70 वर्षाचा हिशोब काढला तर इंग्रजां पेक्षा आपला देश आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला असा आरोप सीने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे