
चिपळूण :- सावर्डे येथे यंग बॉईज क्रिकेट क्लब यांच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या प्रकाश झोतात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी १६ संघाना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची उधळण असून क्रिकेट रसिकांच्यासाठी एक पर्वणीच आहे. दि २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात स्पर्धा खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातून तसेच जगतातील नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत.
स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख २ लाख रुपये व आ. शेखर निकम चषक, द्वित्तीय क्रमांकाचे पारितोषिक रोख १ लाख रुपये व चषक स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूला मोटारसायकल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. इतर वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, षटकारांचा राजा अशीही बक्षिसे दिली जाणार आहेत.

यंग बॉईज क्रिकेट क्लब चे अध्यक्ष श्री केतन पवार तसेच शेखर निकम युवा मंचचे अध्यक्ष सचिन पाकळे व या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार तसेच मार्गदर्शक चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत या स्पर्धेच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.
स्पर्धेच्या तयारीसाठी आमदार शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली यंग बॉईज क्रिकेट क्लब चे सर्व पदाधिकारी तसेच सभासद जय्यत तयारीला लागले आहेत. या स्पर्धेच्या क्रिकेट रसिकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन करण्यात आले आहे.
जाहिरात :

