सावंतवाडी : वाहतुक पोलिसांची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

Spread the love

सिंधुदुर्ग : तळकोकणातील सातुळी तिठा येथे काल उशिरा वाहतूक शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दारू सह ११ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील संशयित दोघे आपल्या ताब्यातील महेंद्रा बोलेरो पिकअप घेवून सावंतवाडीहून कोल्हापुरच्या दिशेने चालले होते. यावेळी त्या ठिकाणी ड्यूटी बजावत असलेल्या वाहतूक पोलिस प्रविण सापळे यांना त्यांची हालचाल संशयास्पद दिसली. यावेळी त्यांनी त्या दोघांना थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान आनंद व्हनमाने (२१), बिरुदेव उर्फ बिरुजानू खरात (२४, दोघेही रा.सांगोला) अशी त्यांची नावे आहेत .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page