प्रचितगड माध्यमिक विद्यालय, कारभाटले येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी…

Spread the love

संगमेश्वर /प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगड माध्यमिक विद्यालय येथे शिक्षणाची ज्योत पेटविणारी, भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, आजीवन आपल्या पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणारी, साहित्यातील बावनकशी रत्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री समीर अत्तार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.

त्यानंतर विद्यायतील विध्यार्थ्यानी आपली मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. श्री धनाजी बेंद्रे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती देत शिक्षण प्रसाराचे योगदान व्यक्त केले तसेच सावित्री बाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून आपली स्वतःची ओळख निर्माण करावी असे सांगितले .

कार्यक्रम प्रसंगी शालेय विध्यार्थी प्रतिनिधी, संस्कृती मालप, अनुष्का जाधव, मुख्याध्यापक श्री समीर अत्तार , शिक्षक धनाजी बेंद्रे, धनाजी भांगे, शिक्षिका छाया बांबाडे उपस्थिती होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page