रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा हा नंबर

Spread the love

भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा…

Indian Railways : प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर कसा होईल यावर जोर देत भारतीय रेल्वे (Railway) विभाग सातत्यानं काही नव्या संकल्पना राबवताना दिसतो. किंबहुना काही अशा सेवाही प्रवाशांना या विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जातात ज्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. याच वेगळेपणामुळं जगभरात Indian Railways ची चर्चा असते. अशा या रेल्वे विभागानं पुन्हा एकदा प्रवाशांपुढे एका खास सुविधेचं ताट वाढलं आहे. 

आता रेल्वे तुमचं पोट भरणार, तेही सोप्या पद्धतीनं… 

रेल्वेमध्ये (Railway food) खाद्यपदार्थ मिळणं ही नवी बाब नाही. आतापर्यंत रेल्वेकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन (Online food order) पद्धतीनं खाण्याची Order देण्याची सुविधा पुरवण्यात येत होती. आता हीच सुविधा Whats App वरही उपलब्ध असणार आहे. त्यामुळं तुम्हीही या सेवेचा अगदी सहजपणे उपभोग घेऊ शकता. 

E Catering Service ला अधिक Customer Focused करण्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. किंबहुना खाद्यपदार्थांच्या ऑर्डरसाठी एक Whats app Number सुद्धा जारी करण्यात आला आहे. ज्यामुळं आता IRCTC च्या माध्यमातून ई कॅटरिंग सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य असेल. यासाठी +91-8750001323 हा क्रमांक वापरात आणावा. त्यामुळं तुम्ही हा क्रमांक Save करूनच ठेवा. 

तुम्हाला येणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवा 

प्राथमिक स्तरावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ई कॅटरिंग सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन स्तरांवर ही योजना आखण्यात आली आहे. जिथं पहिल्या टप्प्यात या बिझनेस व्हाट्सएप नंबर लिंकवर www.ecatering.irctc.co.in क्लिक करताच ई कॅटरिंग सेवेसाठीची तिकीट घेतलेल्या प्रवाशाला यासंदर्भातील मेसेज येईल. या पद्धतीनं प्रवासी त्या त्या रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या स्थानकांवर असणाऱ्या रेस्तराँमधून जेवण मागवू शकतील. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जेवण मागवण्यासाठी तुम्ही आयआरसीटीसीचं अॅप डाऊनलोड करणं अपेक्षित नसेल. 

दुसरा टप्पा म्हणजे ही पद्धत दुहेरी संपर्कासाठी फायद्याची ठरेल. यामध्ये वापरात आणली जाणारी एआय पॉवर चॅटबॉट सुविधा प्रवाशांच्या ई कॅटरिंग सुविधेशी जोडल्या गेलेल्या सर्वच प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी जेवणाची ऑर्डरही देईल. प्राथमिक स्तरावर काही निवडक रेल्वे गाड्यांमध्येच ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास ती इतर रेल्वेंमध्ये लागू करण्यात येईल. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page